Posts

Showing posts from August, 2023

(लघुकथा) संघ शक्ती

Image
तो गावचा सरपंच आहे. धूर्तपणा त्याच्या नसानसांत भिनला आहे. न जाणो, किती लोकांच्या जमिनी त्याने बेमानी करून हडपल्या आहेत.  मात्र आज रामेश्वरच्या सुशिक्षित मुलाने आपल्या वडिलांची जमीन परत घेण्याचा निर्धार केला आहे. आता जमीन गमावलेले सर्व पीडित एकत्र येत आहेत, ही बातमी कळताच सरपंच अस्वस्थ झाला. आज सरपंच घरासमोरच्या अंगणात बसला होता. त्याचे लक्ष एका सापाकडे गेले, जो वेदनेने तडफडत होता. त्याला हजारो मुंग्या चिकटल्या होत्या.  त्याचा मृत्यू निश्चित होता.कारण तो एका छोट्याशा अरुंद छिद्रात अडकला होता. हे दृश्य पाहून सरपंचाला समजले की, शारीरिक किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल देखील एकजूट होऊन बलवानांना पराभूत करू शकतात. काही वेळाने तो रामेश्वरच्या घरी पोहोचला आणि हाक मारली," अरे, रामेश्वर’ बाहेर ये.' रामेश्वर बाहेर येताच त्याने जमिनीची कागदपत्रे त्याच्या हातात दिली.  रामेश्वरने आश्चर्याने विचारले- 'सरपंचजी, तुम्ही तर म्हणाला होतात की मी सगळे कर्ज फेडले नाही, म्हणून  आता तुझी शेती माझी म्हणून.' सरपंच नरमाईनं म्हणाला, 'मित्रा, खाते तपासताना चूक झाली, मला माफ कर.' - मनोरमा पंत (अ...

(लघुकथा) खरं-खोटं

Image
'व्वा, काय पार्टी आहे! चोप्राने आपल्या मुलीच्या लग्नात संपूर्ण शहराला आमंत्रित केले आहे असे दिसते.' दिनेश लाल त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या विनोदला म्हणाला.'तुझं बरोबर आहे.  डेकोरेशन आणि खाण्यापिण्यातच तीन ते चार लाख उडवले असावेत!' विनोदनेही ते मान्य केले.  'आणि मग दुसरं काय तर!  उदंड खर्च केलाय! कसलीच कमतरता नाही. वरची कमाई पगारापेक्षा दुप्पट आहे म्हटल्यावर...'  दिनेशने टिप्पणी केली, विनोदने आपला मुद्दा वाढवला, ‘आणि त्याच कमाईचा तर सगळा खेळ सुरू आहे आजकाल.’ 'तेच तर!  पण एक गोष्ट मान्य करावी लागेल की प्रत्येकजण मित्रांवर असा खर्च करत नाही.प्रत्येकजण फ्लॅट, दुकाने, गोडाऊन असं काही तरी घेऊन टाकतात.' दिनेशच्या आवाजात कौतुक होतं. 'आता भगवतीबाबूच घ्या, गेल्या वर्षी त्यांनी त्यांच्या मुलांचं लग्न केलं. पण जणू काय मुलगी पळवून आणल्यासारखं अगदी गुपचूप सगळं आवरलं. ते बँकेत चोप्रांपेक्षा चार-पाच वर्षांनी सिनियर आहेत, पण मुलखाचे कंजूष!'  'असं बोलू नकोस यार.  केवळ ज्येष्ठतेतच नाही तर प्रतिष्ठेच्या बाबतीतही ते चोप्रांहून खूप वर आहेत, अगदी चोवीस कॅरेट शुद्...