Posts

Showing posts from February, 2023

मनाची श्रीमंती

Image
सरला!  उद्या सकाळी लवकर कामावर ये कारण उद्या बाळाचा वाढदिवस आहे. मी माझ्या ऑफिसमधल्या काही फ्रेंड्सला बोलावलं आहे, आपण बाजारातून वाढदिवसाचा केक आणि मिठाई आणू, पण चहा, पकोडे वगैरे तर तुलाच बनवायला लागतील.' नेहा तिच्या मोलकरणीला म्हणाली. सरला आनंदाने म्हणाली - 'मालकीण बाई!  उद्या चिंटू  दोन वर्षांचा होईल ना?' 'हो सरला, मी तर ऑफिसला जाते, बाळ माझ्यापेक्षा जास्त वेळ तुझ्यासोबतच असतो. तू तर त्याची किती काळजी घेतेस, तू पण त्याच्या आईसारखीच आहेस.’’ सरला म्हणाली,'मालकिनबाई, मी चिंटूच्या वाढदिवसाला गिफ्ट आणते, नाही म्हणू नका.' नेहा म्हणाली,'तुझी इच्छा! तुला हवं तसं कर!' जेवणाच्या वेळी नेहा नवऱ्याला सांगत होती, 'सरला बाळासाठी गिफ्ट आणणार म्हणत होती, छोटंसं खेळणं वगैरे आणेल. शेवटी तिची लायकी तरी किती असणार?पण आपल्यालाही तिला काहीतरी द्यायला हवं. मी बॉक्समधून जुन्या प्रकारातील एकादी साडी रिटर्न गिफ्ट म्हणून देण्याचा विचार करतेय, तसंही त्या साड्यांचा मला काही उपयोग नाहीच.' दुसऱ्या दिवशी सरला आली तेव्हा तिने बाळासाठी एक महागडी तीन चाकी सायकल आणली होती, जी...

(लघुकथा) मेसेज

Image
निलेश, दोन-तीन दिवसांपासून मी बाबांना फोन करतेय पण ते फोनच उचलत नाहीत.  फक्त 'मी ठीक आहे' असा मेसेज पाठवतात.  तुझे बाबा पण ना...' नयना म्हणाली तेव्हा निलेशने आश्चर्याने विचारले , 'इतक्या वर्षांनंतर तुला अचानक त्यांना फोन करण्याची गरज का पडली?' 'अरे काही नाही, दोन्ही मुलं आपापल्या आयुष्यात बिझी आहेत आणि माझ्या किटीच्या मैत्रिणीही त्यांच्या फॅमिलीमध्ये बिझी आहेत, म्हणून म्हटलं, चला, बाबांशीच बोलू.''शेवटी, ते दिवसभर रिकामेच असतात, नाही का?' नीलेश हसला आणि म्हणाला, 'तुला कोणी सांगितलं ते रिकामे बसले आहेत म्हणून. आपण इथे आल्यानंतर जेव्हा जेव्हा बाबांनी तुला फोन केला तेव्हा तेव्हा तू त्यांचा फोन घेण्याऐवजी नेहमी मेसेज करायचीस की 'मी सध्या व्यस्त आहे, सर्व काही ठीक आहे. तू विचारच केला नाहीस की, त्यांनाही त्यांच्या नातवंडांशी बोलण्याची इच्छा होत असेल. मग त्यांनी गावातीलच गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना शिकवण्यात आपलं मन रमवलं.आता त्यांना तुझ्याशी किंवा इतर कोणाशीही फोनवर बोलण्याची गरज पडत नाही.' ते ऐकून नयना चकित झाली. तिने नीलेशकडे पाहिलं जो तिच्...