मनाची श्रीमंती


सरला!  उद्या सकाळी लवकर कामावर ये कारण उद्या बाळाचा वाढदिवस आहे. मी माझ्या ऑफिसमधल्या काही फ्रेंड्सला बोलावलं आहे, आपण बाजारातून वाढदिवसाचा केक आणि मिठाई आणू, पण चहा, पकोडे वगैरे तर तुलाच बनवायला लागतील.' नेहा तिच्या मोलकरणीला म्हणाली.

सरला आनंदाने म्हणाली - 'मालकीण बाई!  उद्या चिंटू  दोन वर्षांचा होईल ना?'
'हो सरला, मी तर ऑफिसला जाते, बाळ माझ्यापेक्षा जास्त वेळ तुझ्यासोबतच असतो. तू तर त्याची किती काळजी घेतेस, तू पण त्याच्या आईसारखीच आहेस.’’ सरला म्हणाली,'मालकिनबाई, मी चिंटूच्या वाढदिवसाला गिफ्ट आणते, नाही म्हणू नका.'
नेहा म्हणाली,'तुझी इच्छा! तुला हवं तसं कर!'
जेवणाच्या वेळी नेहा नवऱ्याला सांगत होती, 'सरला बाळासाठी गिफ्ट आणणार म्हणत होती, छोटंसं खेळणं वगैरे आणेल. शेवटी तिची लायकी तरी किती असणार?पण आपल्यालाही तिला काहीतरी द्यायला हवं. मी बॉक्समधून जुन्या प्रकारातील एकादी साडी रिटर्न गिफ्ट म्हणून देण्याचा विचार करतेय, तसंही त्या साड्यांचा मला काही उपयोग नाहीच.'
दुसऱ्या दिवशी सरला आली तेव्हा तिने बाळासाठी एक महागडी तीन चाकी सायकल आणली होती, जी तिच्यासाठी खूप महाग होती. कदाचित दोन-तीन महिन्यांच्या पगाराइतकी. हे पाहून नेहाला तिच्या विचाराचा पश्चाताप होऊ लागला.  अश्रू लपवत तिने सरलाला जुनी साडी देण्याचा विचार बदलला.
विचार करू लागली की हे गरीब लोक मनाने किती श्रीमंत आहेत आणि पैसा असूनसुद्धा आपण मनाने किती गरीब आहोत. -रामगोपाल आचार्य (अनुवाद -मच्छिंद्र ऐनापुरे, जत)

Comments

Popular posts from this blog

(लघुकथा) मोबाईल

(लघुकथा) मेसेज

(लघुकथा) संघ शक्ती