(लघुकथा) मोबाईल


मम्मी, पप्पाला दोन दिवस  काय झालंय गं?’ मुलीचे बोलणे  ऐकून मम्मी म्हणाली, ‘का, तुझ्या पप्पाला आणि काय होतंय?’

मुलगी, 'पप्पा दोन दिवस झालं बदलल्या बदलल्यासारखे दिसतात. दोन दिवसांपासून बघतेय मी सकाळी लवकर उठतात आणि मला माझे विज्ञान विषयात मदत करतात, वर्तमानपत्रे जे कधी काळी त्यांना  जीव का प्राण होते आता त्यात पुन्हा रस दाखवयाला सुरुवात केली आहे. शिवाय त्यांना गेले दोन दिवस  तुझ्याशी आणि आजोबांशी तासनतास बोलत असताना पाहिलंय.दोन दिवसांपूर्वी ते म्हणायचे की माझ्याकडे वेळ नाही, आणि आज तर त्यांच्याकडे वेळच वेळ आहे असे वाटते. असं अचानक काय झालंय, काही समजलंय का?'

मुलीचे बोलणे ऐकून आई हसत म्हणाली, ' अगं, काही नाही गं, दोन दिवसांपूर्वी त्यांचा मोबाइल खराब झालाय.तो त्यांनी दुरुस्त करायला कंपनीकडे पाठवलाय. आता सध्या तो मोबाईलशिवायचं जीवन जगत आहेत.'

- मनीष कुमार गहलोत

अनुवाद- मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


Comments

Popular posts from this blog

(लघुकथा) मेसेज

मनाची श्रीमंती