(लघुकथा) कलर बॉक्स

  'आम्हाला साधी सरळ मुलगी हवी' हे शब्द काल संध्याकाळपासून इराच्या डोक्यात हातोड्यासारखे बसत होते. त्या लोकांच्या व्याख्येत त्याचा सरळ अर्थ असा होतो की, 'सुशिक्षित, नोकरी करणारी, घरातील सर्व कामे करणारी, सासू-सासरच्यांचे नियम-कायदे पाळणारी आणि घरातील पुरुषांच्या अधीन राहणारी.'जसे की मुलगी कलर बॉक्स जणू, आपल्या इच्छेनुसार मिसळा आणि जुळवा. अशा लोकांची आधुनिकता फक्त सुनेला नोकरी मिळवून देण्यापुरतीच मर्यादित असल्याची चीड कालपासून तिच्या मनात भरली होती.आदल्या दिवशी, जेव्हा तिने मुलाच्या घरच्यांना सांगितले की ती काही दिवसांपूर्वी डेहराडूनला एकट्याने सहलीला गेली होती, तेव्हा त्यांचे वागणे एकदमच बदलले आणि दुसऱ्या दिवशी वडिलांना रिजेक्शनचा फोन आला.


ऑफिसमधून परतत असताना, तिच्या मनात याच विषयावर तर्क-वितर्क सुरू असतानाच तिला रस्त्यात अपघात झाल्याचे दिसले.गाडीतून खाली उतरल्यानंतर ती जखमीं माणसापर्यंत पोहोचली. अरे, हा तर सार्थक आहे, परवा तिला बघायला आला होता.'' एकदा तिच्या मनाने म्हटले, जाऊ दे सोड,आपल्याला घरी जायला उशीर होतोय, पण पुढच्याच क्षणी आतल्या मनाने तिचे हे विचार झटकून टाकले. तिने लगेचच काही लोकांच्या मदतीने त्याला बेशुद्ध अवस्थेत  हॉस्पिटलमध्ये नेले.

तिच्या वडिलांकरवी तिने त्याच्या पालकांना कॉल केला.शुद्धीवर आल्यावर इराला पाहून सार्थकला धक्काच बसला. मग शर्मीन्दा होऊन म्हणाला,"‘सॉरी इरा, आमची खूप मोठी चूक झाली.’ इराने काहीच उत्तर दिले नाही, समोरून येणाऱ्या सार्थकच्या आई-वडिलांना नमस्कार करून ती हॉस्पिटलमधून निघून गेली. -डॉ. शिखा अग्रवाल

अनुवाद-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली




Comments

Popular posts from this blog

(लघुकथा) मोबाईल

(लघुकथा) मेसेज

मनाची श्रीमंती