लघुकथा -व्यवहार


एका कंपनीत मॅनेजर पदासाठी मुलाखत चालू होती. यासाठी चार जणांना बोलावण्यात आले होते. पहिला उमेदवार मुलाखत देण्यासाठी खोलीत गेला.  काही वेळाने इंटरव्ह्यू दिल्यावर तो बाहेर येऊन बसला.त्याला थोडा वेळ बाहेर बसून वाट पाहायला सांगण्यात आलं होतं. त्यानंतर दुसरा उमेदवार या उमेदवाराकडे आला आणि त्याला विनवणी करत म्हणाला, 'तुमचा इंटरव्यू झाला आहे.  कृपया थोडा वेळ तुमचा टाय देऊन मला मदत करा.' त्या उमेदवाराने टाय देण्यास साफ नकार दिला. तो तिसऱ्या उमेदवाराची मदत मागतो, तोही नकार देतो,पण शेवटी चौथा उमेदवार त्याला मदत करायला तयार होतो. शेवटी, तो उमेदवारही टाय घालून इंटरव्ह्यू रूममध्ये जातो. काही वेळाने इतर तीन उमेदवारांनाही आत बोलावले जाते. ते तिघे आत जातात आणि त्यांना हे पाहून आश्चर्य वाटते की टाय मागणारी व्यक्ती उमेदवार नसून कंपनीचा मालक आहे. टाय देणाऱ्या तरुणाला तो नोकरी देतो. कंपनीचा मालक या तिघांना सांगतो, ' केवळ पदवी मिळवणे पुरेसे नाही, आयुष्यात इतरांना मदत करणे, चांगली वागणूकही महत्त्वाची आहे. हे गोष्टीच आपल्या यशाचा आधार बनतात.  हे आपण समजून घेतले पाहिजे.'

-  रेखा शाह आरबी (अनुवाद- मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली)

Comments

Popular posts from this blog

(लघुकथा) मोबाईल

(लघुकथा) मेसेज

मनाची श्रीमंती