(लघुकथा) पिंपळ आणि लिंब


ते नगर परिषदेचे नगराध्यक्ष आहेत. पर्यावरण रक्षणासाठी एका कार्यक्रमात त्यांनी भावनिक भाषण केले.अंदाधुंद वृक्षतोडीवर बोलताना त्यांचा कंठ दाटून आला होता. पिंपळ वृक्षाचे धार्मिक महत्त्व सांगताना ते म्हणाले की, हे झाड रात्रीच्या वेळीही ऑक्सिजन सोडते.

लिंब आणि तुळशीच्या औषधी गुणधर्मांबद्दलही त्यांनी सांगितले. महाभारतातील एका श्लोकाचा हवाला देत त्यांनी झाड हे पुत्रसमान असते हेदेखील सांगायला ते विसरले नाहीत.म्हणून, ते कोणत्याही किंमतीत संरक्षित केले पाहिजे.

कार्यक्रमानंतर ते थेट नगर परिषदेच्या कार्यालयात गेले.त्याच्या केबिनमध्ये एक माणूस त्यांचीच वाट पाहात थांबला होता. दोघेही एकमेकांकडे पाहून हसले. नगराध्यक्ष खुर्चीवर बसताच त्या व्यक्तीने एक नोटांचा बंडल आणि एक फाईल नगराध्यक्षांसमोर ठेवली. साहेब पुन्हा हसले, 'किती झाडं तोडणार?'

'साहेब!  पंधरा.'

'त्यात कोणती झाडं आहेत?'

'सर, त्यांपैकी सहा पिंपळ आणि नऊ लिंबाची आहेत.'

फाईलवर स्वीकृतीची स्वाक्षरी करत 'घे बाबा घे, तू ही बनव मल्टीफ्लॅक्स या झाडांचं काय?  ही शतकानुशतके तोडली जातात आणि वाढवली जातात.- प्रभाशंकर उपाध्याय

अनुवाद-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Comments

Popular posts from this blog

(लघुकथा) मोबाईल

(लघुकथा) मेसेज

मनाची श्रीमंती