(लघुकथा) पेन्शनची अपेक्षा


मी माझ्या शाळेतील वर्गमित्राला एका स्नेहमेळाव्यात भेटलो. त्याच्याशी खूप गप्पा झाल्या. जेवतानादेखील हा संवाद अव्याहत चालूच होता. वर्गमित्राने गेल्या पंधरा वर्षांत दहाहून अधिक व्यवसाय केले पण एकाही व्यवसायात पाय स्थिर ठेवता आला नाही.

‘काय चाललंय हल्ली?’ मी कुतूहलाने विचारलं.

'मी सध्या काहीतरी नवीन करायचा विचार करतोय.' वर्गमित्र खोटं हसू चेहऱ्यावर आणत म्हणाला.

'चल, ठीक आहे.  आणि हो, वहिनी आता  रिटायर्ड झाल्या असतील ना?’ मी विचारलं.

अरे, तिला आताच कुठे लगेच रिटायर्ड करतोयस?  ती आता पंचावन्न वर्षांची आहे आणि अजून पाच वर्षे बाकी आहेत!'' उमेश अभिमानाने म्हणाला.

'अरे वाह!  मग ठीक आहे.  आता तरी नवीन काम काळजीपूर्वक कर.  वहिनी रिटायरमेंट होण्यापूर्वी किमान व्यवसायात तरी जम बसव.'' मी गंभीरपणे म्हणालो.

'मी माझ्या परीने प्रयत्न करेन पण तोपर्यंत तुझ्या वहिनीची पेन्शन सुरू होईल.' वर्गमित्र भावी पेन्शनच्या आशेने आत्मविश्‍वासाने म्हणाला.

'अरे हो, तेवढ्यात वहिनीची पेन्शनही सुरू होईल.' मी त्याच्या  होकाराला होकार देत म्हणालो.

माझा वर्गमित्र कोणत्याही व्यवसायात का स्थिरावू शकला नाही याचे कारण आता मला चांगले समजले.

- तरुण कुमार दाधीच

(अनुवाद- मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली)

Comments

Popular posts from this blog

(लघुकथा) मोबाईल

(लघुकथा) मेसेज

मनाची श्रीमंती