Posts

Showing posts from July, 2023

(लघुकथा) मोबाईल

Image
मम्मी, पप्पाला दोन दिवस  काय झालंय गं?’ मुलीचे बोलणे  ऐकून मम्मी म्हणाली, ‘का, तुझ्या पप्पाला आणि काय होतंय?’ मुलगी, 'पप्पा दोन दिवस झालं बदलल्या बदलल्यासारखे दिसतात. दोन दिवसांपासून बघतेय मी सकाळी लवकर उठतात आणि मला माझे विज्ञान विषयात मदत करतात, वर्तमानपत्रे जे कधी काळी त्यांना  जीव का प्राण होते आता त्यात पुन्हा रस दाखवयाला सुरुवात केली आहे. शिवाय त्यांना गेले दोन दिवस  तुझ्याशी आणि आजोबांशी तासनतास बोलत असताना पाहिलंय.दोन दिवसांपूर्वी ते म्हणायचे की माझ्याकडे वेळ नाही, आणि आज तर त्यांच्याकडे वेळच वेळ आहे असे वाटते. असं अचानक काय झालंय, काही समजलंय का?' मुलीचे बोलणे ऐकून आई हसत म्हणाली, ' अगं, काही नाही गं, दोन दिवसांपूर्वी त्यांचा मोबाइल खराब झालाय.तो त्यांनी दुरुस्त करायला कंपनीकडे पाठवलाय. आता सध्या तो मोबाईलशिवायचं जीवन जगत आहेत.' - मनीष कुमार गहलोत अनुवाद- मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

(लघुकथा) कलर बॉक्स

Image
  'आम्हाला साधी सरळ मुलगी हवी' हे शब्द काल संध्याकाळपासून इराच्या डोक्यात हातोड्यासारखे बसत होते. त्या लोकांच्या व्याख्येत त्याचा सरळ अर्थ असा होतो की, 'सुशिक्षित, नोकरी करणारी, घरातील सर्व कामे करणारी, सासू-सासरच्यांचे नियम-कायदे पाळणारी आणि घरातील पुरुषांच्या अधीन राहणारी.'जसे की मुलगी कलर बॉक्स जणू, आपल्या इच्छेनुसार मिसळा आणि जुळवा. अशा लोकांची आधुनिकता फक्त सुनेला नोकरी मिळवून देण्यापुरतीच मर्यादित असल्याची चीड कालपासून तिच्या मनात भरली होती.आदल्या दिवशी, जेव्हा तिने मुलाच्या घरच्यांना सांगितले की ती काही दिवसांपूर्वी डेहराडूनला एकट्याने सहलीला गेली होती, तेव्हा त्यांचे वागणे एकदमच बदलले आणि दुसऱ्या दिवशी वडिलांना रिजेक्शनचा फोन आला. ऑफिसमधून परतत असताना, तिच्या मनात याच विषयावर तर्क-वितर्क सुरू असतानाच तिला रस्त्यात अपघात झाल्याचे दिसले.गाडीतून खाली उतरल्यानंतर ती जखमीं माणसापर्यंत पोहोचली. अरे, हा तर सार्थक आहे, परवा तिला बघायला आला होता.'' एकदा तिच्या मनाने म्हटले, जाऊ दे सोड,आपल्याला घरी जायला उशीर होतोय, पण पुढच्याच क्षणी आतल्या मनाने तिचे हे विचार झटक

(लघुकथा) पेन्शनची अपेक्षा

Image
मी माझ्या शाळेतील वर्गमित्राला एका स्नेहमेळाव्यात भेटलो. त्याच्याशी खूप गप्पा झाल्या. जेवतानादेखील हा संवाद अव्याहत चालूच होता. वर्गमित्राने गेल्या पंधरा वर्षांत दहाहून अधिक व्यवसाय केले पण एकाही व्यवसायात पाय स्थिर ठेवता आला नाही. ‘काय चाललंय हल्ली?’ मी कुतूहलाने विचारलं. 'मी सध्या काहीतरी नवीन करायचा विचार करतोय.' वर्गमित्र खोटं हसू चेहऱ्यावर आणत म्हणाला. 'चल, ठीक आहे.  आणि हो, वहिनी आता  रिटायर्ड झाल्या असतील ना?’ मी विचारलं. अरे, तिला आताच कुठे लगेच रिटायर्ड करतोयस?  ती आता पंचावन्न वर्षांची आहे आणि अजून पाच वर्षे बाकी आहेत!'' उमेश अभिमानाने म्हणाला. 'अरे वाह!  मग ठीक आहे.  आता तरी नवीन काम काळजीपूर्वक कर.  वहिनी रिटायरमेंट होण्यापूर्वी किमान व्यवसायात तरी जम बसव.'' मी गंभीरपणे म्हणालो. 'मी माझ्या परीने प्रयत्न करेन पण तोपर्यंत तुझ्या वहिनीची पेन्शन सुरू होईल.' वर्गमित्र भावी पेन्शनच्या आशेने आत्मविश्‍वासाने म्हणाला. 'अरे हो, तेवढ्यात वहिनीची पेन्शनही सुरू होईल.' मी त्याच्या  होकाराला होकार देत म्हणालो. माझा वर्गमित्र कोणत्याही व्यवसा

(लघुकथा) पिंपळ आणि लिंब

Image
ते नगर परिषदेचे नगराध्यक्ष आहेत. पर्यावरण रक्षणासाठी एका कार्यक्रमात त्यांनी भावनिक भाषण केले.अंदाधुंद वृक्षतोडीवर बोलताना त्यांचा कंठ दाटून आला होता. पिंपळ वृक्षाचे धार्मिक महत्त्व सांगताना ते म्हणाले की, हे झाड रात्रीच्या वेळीही ऑक्सिजन सोडते. लिंब आणि तुळशीच्या औषधी गुणधर्मांबद्दलही त्यांनी सांगितले. महाभारतातील एका श्लोकाचा हवाला देत त्यांनी झाड हे पुत्रसमान असते हेदेखील सांगायला ते विसरले नाहीत.म्हणून, ते कोणत्याही किंमतीत संरक्षित केले पाहिजे. कार्यक्रमानंतर ते थेट नगर परिषदेच्या कार्यालयात गेले.त्याच्या केबिनमध्ये एक माणूस त्यांचीच वाट पाहात थांबला होता. दोघेही एकमेकांकडे पाहून हसले. नगराध्यक्ष खुर्चीवर बसताच त्या व्यक्तीने एक नोटांचा बंडल आणि एक फाईल नगराध्यक्षांसमोर ठेवली. साहेब पुन्हा हसले, 'किती झाडं तोडणार?' 'साहेब!  पंधरा.' 'त्यात कोणती झाडं आहेत?' 'सर, त्यांपैकी सहा पिंपळ आणि नऊ लिंबाची आहेत.' फाईलवर स्वीकृतीची स्वाक्षरी करत 'घे बाबा घे, तू ही बनव मल्टीफ्लॅक्स या झाडांचं काय?  ही शतकानुशतके तोडली जातात आणि वाढवली जातात.- प्रभाशंकर उपाध्