(लघुकथा) संघ शक्ती
तो गावचा सरपंच आहे. धूर्तपणा त्याच्या नसानसांत भिनला आहे. न जाणो, किती लोकांच्या जमिनी त्याने बेमानी करून हडपल्या आहेत. मात्र आज रामेश्वरच्या सुशिक्षित मुलाने आपल्या वडिलांची जमीन परत घेण्याचा निर्धार केला आहे. आता जमीन गमावलेले सर्व पीडित एकत्र येत आहेत, ही बातमी कळताच सरपंच अस्वस्थ झाला. आज सरपंच घरासमोरच्या अंगणात बसला होता. त्याचे लक्ष एका सापाकडे गेले, जो वेदनेने तडफडत होता. त्याला हजारो मुंग्या चिकटल्या होत्या. त्याचा मृत्यू निश्चित होता.कारण तो एका छोट्याशा अरुंद छिद्रात अडकला होता. हे दृश्य पाहून सरपंचाला समजले की, शारीरिक किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल देखील एकजूट होऊन बलवानांना पराभूत करू शकतात. काही वेळाने तो रामेश्वरच्या घरी पोहोचला आणि हाक मारली," अरे, रामेश्वर’ बाहेर ये.' रामेश्वर बाहेर येताच त्याने जमिनीची कागदपत्रे त्याच्या हातात दिली. रामेश्वरने आश्चर्याने विचारले- 'सरपंचजी, तुम्ही तर म्हणाला होतात की मी सगळे कर्ज फेडले नाही, म्हणून आता तुझी शेती माझी म्हणून.' सरपंच नरमाईनं म्हणाला, 'मित्रा, खाते तपासताना चूक झाली, मला माफ कर.' - मनोरमा पंत (अ